मद्यधुंद अवस्थेत महिलेचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की


 मुंबई : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ एका महिलेने  मद्यप्राशन करून  धिंगाणा घातला असल्याचा हा प्रकार घडला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिसाची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार तिथे उभे असलेला पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता.


धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुन्या टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शीतलपासून पुढे असलेल्या महामार्गालगत हा प्रकार घडला. 40 वर्षीय महिला अलका किशोर पाटील आणि तिचा दीर भूषण ज्ञानेश्वर पाटील हे रस्त्यावर गोंधळ घालत होते. या ठिकाणी गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्या पुरुषाला विचारणा करत असताना महिलेने उलट पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

यावेळी घटनास्थळी पोलिसांनी दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. संबंधित महिला आणि पुरुषाने म्हणजेच तिच्या दीराने मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments