*खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेची वार्षिक अधिमंडळ बैठक संपन्न*

*खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेची  वार्षिक अधिमंडळ बैठक संपन्न*



●अल्पावधीतच नावारूपाला आलेली खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,जिल्हा रत्नागिरी ह्या संस्थेची अधिमंडळ वार्षिक बैठक शासकीय नियमांच्या अधिन राहून खारवी समाज भवन,रत्नागिरी येथे दिनांक ७/३/२०२१ रोजी  संपन्न झाली.ही बैठक मर्यादित सभासदांच्या उपस्थितीत झाली.


●बैठकीची सुरुवात दिपप्रज्वलन करून संचालक मंडळाने केली. त्यानंतर ज्ञात अज्ञात सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.वार्षिक अधिमंडळ बैठकीत ठेवलेल्या विषयाच्या अनुषंगाने वाचन करण्यात आले व प्रत्येक विषयांवर चर्चा विनिमय करून संस्थेच्या सभासदांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन संस्थेचे अध्यक्ष मा. संतोष जी पावरी व मुख्याधिकारी श्री.प्रसाद जी खडपे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.गत तीन वर्षात तीन हजार सातशे पंचेचाळीस सभासद व  उलाढाल तीन कोटी पर्यंत नेण्याचा उच्चांक खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांनी केला आहे. प्रथम वर्षातच सात टक्के घसघशीत लाभांश देऊन सभासदांना सुखद धक्का दिला. संस्थेच्या सभासदांना गरजेनुसार कर्जवितरण केले व त्याचबरोबर कर्ज वसूली बाबत एनपीए शून्य राखल्यामुळे  पतसंस्थेवर सभासदांनी अधिक विश्वास टाकला व संस्थेच्या उन्नतीसाठी संचालक मंडळ यांच्या सहकार्याने येत्या वर्षभरात ह्या संस्थेचा विस्तार करण्यासाठी व शाखा निर्मितीसाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध आहोत असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष मा. संतोषजी पावरीसाहेब यांनी सभासदांना दिले .


●संस्थेची वाटचाल व भविष्यातील उत्क्रांतीचा चढता आलेख पहाता सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.


●संस्थेच्या वतीने आलेल्या सभासदांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.सभा यशस्वी करण्यासाठी संस्था प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळ यांनी मोलाचे योगदान दिले.


 ........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Comments