साडवलीतील आरुष चव्हाण जगात नववा

साडवलीतील आरुष चव्हाण जगात नववा 




साडवली : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलमधील चौथीतील आरुष चव्हाणने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जगात नववा क्रमांक मिळवला आहे.आयुषने मिळविलेल्या या यशाने पी.एस.बने स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतात.आरुष चव्हाणने इंग्रजी विषयामध्ये ४० पैकी ३८ गुण मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर ९ वा येण्याचा मान मिळवला आहे .त्याच्या या यशाबद्दल संस्था सचिव व माजी आमदार सुभाष बने,जि.प.अध्यक्ष रोहन बने ,पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डेव्हिड विल्सन,पर्यवेक्षक दीप्ती भालेकर,

सर्व शिक्षक यांनी त्याचे व पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 


 .........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या