महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

 

(छाया - तय्यब अली)
कोल्हापूर बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिका या संघटने बेकादेशीर लाल पिवळा ध्वज उभा केला आहे. हा ध्वज त्वरीत हटवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या वतीने जिल्हा आंदोलन सुरू आहे. मराठी भाषिकांचा स्वाभिमान डिवचण्यासाठी दि. 12/03/2021 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे नामफलक व गाडीला कन्नड रक्षक वैदिक या संघटनेने काळे फसण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे.  कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे या कृत्याच्या विरोधात जनआंदोलन सुरू केले आहे. दि. 12/03/2021 रोजी कर्नाटक परिवहनच्या एस.टी. महाराष्ट्रात फिरवणे शिवसेनेने बंद केले आहे.  याचाच एक भाग म्हणून कर्नाटकातील सर्व भाडोत्री वाहने KA पासिंग असणाऱ्या वाहनांना महाराष्ट्रात येणेसाठी देण्यात येणारे परवाने देऊ नयेत व भाडोत्री वाहनांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नयेत. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, तसेच अशोक पाटील, शिवगोंडा पाटील,  कांचन माने, दिपाली घोरपडे, संभाजी भोकरे, मंजित माने, संदीप पाटील, वैभव जाधव आदी उपस्थित होते.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या