राजापूरातील सौंदळ गावात होतेय विनापरवाना खैर तोड

 राजापूरातील सौंदळ गावात होतेय विनापरवाना खैर तोड


  • तक्रार करुनही वन विभागाची अद्याप कारवाई नाही
  • कारवाई करण्यास विलंब का? उलट सुलट चर्चांना उधाण

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील सौंदळ गावात विनापरवाना खैर वृक्षांची तोड होतेय. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सौंदळ गावातील पांडूरंग महादेव मांजरे यांच्या सर्वे नंबर १४३ हिस्सा नंबर ९ सामाईक मालकी वहिवाटीच्या मिळकतीमधील सुमारे १५० ते २०० खैराची वजन सुमारे ३०० मण बेकायदेशीररित्या विनापरवाना तोडण्यात आली आहेत. यासंदर्भात पांडूरंग महादेव मांजरे यांनी राजापूर तहसिल कार्यालय व राजापूर वन विभागाकडे लेखी तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारिवरुन अधिका-यांनी सौंदळ येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितिची पाहणी देखील केली आहे. राजाराम हरी मांजरे, सखाराम हरी मांजरे दोन्हीही रा.सौंदळ, ता.राजापूर व श्री नारकर रा.चिखलगाव यांच्याविरोधात ही तक्रार दिली आहे. खरे तर खैर वृक्षांची तोड करण्यासाठी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज व अन्य कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. मात्र या घटनेत असे काहीही झाले नसल्याची माहीती पांडूरंग महादेव मांजरे यांनी दिली आहे. दिनांक ९ मार्च २०२१ रोजी ही तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत वन विभागाच्या अधिका-यांनी संबंधितांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी नेमके कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करित आहेत का असा सवाल उपस्थीत केला जात आहे. ही कारवाई करण्यासाठी वन विभागाला विलंब का लागतोय असे उलट सुलट चर्चांना आता उधाण येत आहे. 

.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या