शिवसेनेच्या दणक्याने ब्रम्हपुरी येथील बेकायदेशीर काम बंद बेकायदेशीर कामास संतप्त महिलांनी ठोकले टाळे
यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा धिक्कार असो”, “बेकायदेशीर काम बंद झालेच पाहिजे”, अशा घोषणांनी ब्रम्हपुरी चर्च परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी, हॉली इव्हेंजलिस्ट चर्च, ब्रम्हपुरी, कोल्हापूर समाज मंदिर दि बॉम्बे डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रा.लि. मुंबई या नोंदणीकृत ट्रस्टच्या अंतर्गत येत असून, सदर ट्रस्टच्या राज्यातील अनेक शहरांमध्ये स्थावर मिळकती आहेत. त्यापैकी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सि.स.नं.२३५३, डी वॉर्ड ब्रम्हपुरी ही मिळकत ट्रस्टच्या मालकीची आहे. सदर ठिकाणी वर्षानुवर्षे १०० ख्रिस्ती कुटुंबाची रहिवासी कॉलनी व अत्यंत जुनी अशी हॉली इव्हेंजलिस्ट चर्च व पॅरिश हॉल असून सदर चर्च व हॉलचा वापर धार्मिक व सामाजिक कार्याकरिता नित्यनियमाने केला जातो. सदर मिळकतीमधील पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काडीमात्र संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून अनाधिकाराने काही दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. याबाबत संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने जिल्हा पोलीस प्रशासनासह स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली आहे. या मिळकतीबाबत मा.धर्मादाय आयुक्त, मुंबई, मे.उच्च न्यायालय, मुंबई व मे.दिवाणी न्यायालय, मुंबई येथे काही दावे दाखल होवून निकाली लागले आहेत. तसेच मे.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट पिटीशन स्टॅम्प नुसार ट्रस्ट संदर्भातील पक्षकारांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला असताना सदर मिळकतीमध्ये अनधिकृत रित्या बांधकाम केले जात आहे. याविरोधात दाखल तक्रारी बाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न शिवसेना स्टाईलने सोडवण्यास पुढे आली असून, स्थानिक ख्रिश्चन बांधवांना न्याय मिळवून दिल्या शिवाय शिवसेना स्वस्त बसणार नसल्याचा इशारा दिला.
यावेळी बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारास कागदपत्रे दाखविण्याच्या सूचना केल्या. परंतु, त्यांच्याकडे बांधकाम परवानगीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. यासह ट्रस्टकडे असणारे मे.न्यायालयाचे आदेश डावलून काम सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आक्रमक होत कंत्राटदारास काम बंद करण्यास भाग पाडून कार्यालयाबाहेर काढले. यावेळी स्थानिक महिलांनी कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख सुशील भांदिगरे, शाखाप्रमुख कपिल नाळे, सचिन क्षीरसागर, कल्पेश नाळे, राजू कुंडले, बबन शिंदे, स्थानिक ख्रिश्चन समाजाच्या शिला चिंचलीकर, अबिगेल भोसले, रिबेका महाजन, अर्चना खोडवे, वैशाली भोसले, प्राची वायदंडे, शकिला लोखंडे, अरुण सावंत, संदीप आवळे, प्रफुल्ल महाजन, महेश भालेराव, संजय भोसले, संजय आवळे, विनोद लोखंडे आदी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


Comments
Post a Comment