खोकला, ताप आणि थकव्यासाठी तज्ज्ञांनी सांगतले आयुर्वेदिक उपाय
मुंबई: कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. खोकला, ताप आणि थकवा ही कोरोनाची सर्वात जवळची लक्षणं आहेत. घरगुती उपाय करूनही रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते आणि लवकर बरंदेखील होता येतं. गंभीर त्रास होणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण क्वॉरंटाईन असलेल्यांना आणि थोडासा त्रास होणाऱ्यांना सोपे आयुर्वेदिक उपाय करूनही आजारावर मात करता येते. आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर रेखा राधामोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कोविड-19 च्या दुर्मिळ लक्षणांवर उपाय करणारे आयुर्वेदिक प्रोटोकॉल शेअर केले आहेत.
पाणी
डॉक्टर रेखाच्या मते, सुकलेलं आलं आणि तुळशीच्या पानांसोबत गरम पाणी प्यायला हवे. हे सोपे मिश्रण बनवण्यासाठी थोड्या पाण्यात सुक्या आल्याचा तुकडा घेऊन ते पाणी प्रमाणात उकळावे. त्यानंतर त्यात तुळशीची पानं मिसळून दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने प्यावे.
अन्नपदार्थ
गरम आणि ताजे अन्न खावे. भात आणि मीठ व तेल न टाकता बनवलेले मूगाच्या डाळीच्या सूपाचा समावेश दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवनात करावा. अतीप्रमाणात जेवण करू नये. रात्रीचे जेवण 7 वाजण्यापूर्वी करायला हवे.
मसाले
भारतीय मसाले आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दालचिनी, काळी मिरची, वेलची आणि चक्र फूलाचा समावेश जेवणात करायला हवा. तसेच सुकी हळद आणि सुक्या आल्याचा समावेश देखील असावा.
फळं
जर तुम्ही लक्षणविरहीत असाल तर तुम्ही डाळिंब आणि द्राक्षासारखी फळे खायला हवीत आणि तुम्हाला जर कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्ही फळं खाणं टाळलं पाहिजे.
भाज्या
पूर्णपणे शिजवलेल्या भाज्याच खायला हव्यात. न शिजवलेल्या भाज्या आणि कोशिंबीर खाणं टाळावं. कारल्यासारख्या कडू भाज्या खायला हव्यात. वांगे, टोमॅटो आणि बटाटा खाणेदेखील टाळावं.
व्यायाम
कोरोनाची लक्षणं दिसत असतील किंवा थकवा जाणवत असेल तर शारिरीक कसरतींचे प्रकार टाळावे. परंतु 30 मिनिटे प्राणायम करायला हवे.
जडी-बूटी
खोकला झाल्यास एक चमचा मधासोबत काळी मिरची पावडर एकत्र करून दिवसातून तीन ते चार वेळा प्यावे. गळा दुखत असेल तर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment