मी रिपब्लिकन" सांगली जिल्हा मेळावा पूर्व नियोजन बैठक संपन्न
मिरज:- ( प्रतिनिधी )
आज दि. २१ मार्च रोजी दि. ०३ मे २०२१ रोजी तासगाव येथे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मा. महापौर व विद्यमान नगरसेवक मा. विवेकरावजी कांबळे साहेब, रिपाइं चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटनीस तथा विद्यमान नगरसेवक मा. जगन्नाथदादा ठोकळे यांच्या प्रमुख मागदर्शनाखाली, रिपाइं चे सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजयजी कांबळे व मा. राजेशजी तिरमारे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष तथा मा. नगरसेवक मा. अशोकरावजी कांबळे, सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष मा. संदेशजी भंडारे व महिला सांगली जिल्हाध्यक्षा मा. छायादीदी सर्वदे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे "मी रिपब्लिकन" मेळावा आयोजित असुन "मी रिपब्लिकन" मेळावा पूर्व बैठक आज तासगाव येथील हॉटेल शिवप्रताप येथे शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.प्रथमतः सर्व महापुरूषांना वंदन करणेत आले. यावेळी नियोजन पूर्व बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विवेकरावजी कांबळे साहेब, पश्चिम महाराष्ट्र सरचिटनीस मा. जगन्नाथदादा ठोकळे, व्हि.जे.एन.टी. आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सतिशदादा जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजयजी कांबळे व मा. राजेशजी तिरमारे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा मा. छायादीदी सर्वदे यांचा शॉल,पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून रिपाइं तासगाव तालुका यांचे वतीने सत्कार करणेत आला.बैठकी दरम्यान दलित महासंघाचे जिल्हा नेते मा. मुन्नाभाई कोकणे यांनी रिपाइं(आठवले) पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला. त्यांचे प्रदेश सचिव मा. कांबळे साहेब यांचे हस्ते फेटा,शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. तसेच बैठकीस उपस्थित सर्वच आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार करणेत आला.बैठकीच्या सुरवातीस प्रास्तविक व स्वागत रिपाइंचे तासगाव तालूकाध्यक्ष मा. प्रविण धेंडे यांनी केले. यानंतर रिपाइं सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष मा. संदेशजी भंडारे यांनी "मी रिपब्लिकन" ही संकल्पना समजावून सांगितली.यावेळी रिपाइं(आठवले) चे युवा नेते मा. श्वेतपद्म(भैया) कांबळे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा. अभिजीत आठवले सर, पश्चिम महाराष्ट्र सरचिटनीस मा. जगन्नाथदादा ठोकळे, सांगली जिल्हाध्यक्ष मा. राजेशजी तिरमारे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे, आटपाडी तालूकाध्यक्ष मा. राजेंद्रजी खरात, खानापुर तालूकाध्यक्ष मा. दादासाहेब चंदनशिवे, जत तालूकाध्यक्ष मा. श्रीकांत हूवाळे सर, कवठेमहांकाळ तालूकाध्यक्ष मा. पिंटू माने, सांगली जिल्हा सरचिटनीस मा. डॉ. रविकुमार गवई सर, ब.वि.प.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सचिनजी सव्वाखंडे, विभागीय सरचिटनीस मा. सचिनजी जाधव, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. बापू सोनवणे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा मा. छायादीदी सर्वदे, पलुस तालूकाध्यक्ष मा. बोधीसत्व माने, मा. अरूण आठवले, मिरज तालूकाध्यक्ष मा. अरविंद कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजयजी कांबळे या मान्यवरांनी "मी रिपब्लिकन" मेळाव्या संदर्भात विवीध सुचना व मार्गदर्शन केले.यावेळी मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक मा. विवेकरावजी कांबळे साहेब पदाधिकायांना सुचना करताना म्हणाले दि. ०३ मे २०२१ रोजी तासगांव येथे केंद्रिय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये "मी रिपब्लिकन" या संकल्पनेतील "सांगली जिल्हा मी स्वाभिमानी रिपब्लिकन" मेळावा आयोजित आहे. तर हा मेळावा तासगाव येथे आयोजित असुन सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी या मेळाव्याकरिता आपले योगदान द्यायचे आहे. या पुढे भारतीय संविधान दिन दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रतेक वर्षी सांगली जिह्यातील प्रतेक तालुक्यात " मी स्वाभिमानी रिपब्लिकन " मेळावे आयोजित करण्याची संकल्पना असुन या पद्धतीने प्रतेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे."मी रिपब्लिकन" मेळाव्या दरम्यान रिपाइंच्या कार्यकर्त्यांना "आत्मनिर्भर व स्वाभिमानी" करण्यासाठी प्रयत्न करणार असुन रिपाइं च्या प्रतेक कार्यकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.बैठकीच्या शेवटी तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मा. विवेकरावजी कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले."मी रिपब्लिकन" मेळावा पुर्व नियोजन बैठकीस सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment