उद्या वेबिनार: पावसाचे पाणी साठविण्याविषयी

उद्या वेबिनार: पावसाचे पाणी साठविण्याविषयी 




 रत्नागिरी : रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळ आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० मार्च रोजी आठवी-नववीतील विद्यार्थ्यांसाठी पावसाचे पाणी साठविण्याविषयी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. Catch The Rain, Where it Falls, When it Falls म्हणजेच पाऊस साठवा, जिथे पडतो, जेव्हा पडतो या उपक्रमाअंतर्गत जलसाक्षरता या विषयावर हे वेबिनार होणार आहे. येत्या १o मार्च रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत वेबिनार होईल. आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांसाठी होणार असलेल्या वेबिनारला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवळी येथील यशवंतराव माने विद्यालयाच्या सहायक शिक्षिका सौ. संघमित्रा विजय कुरतडकर आणि रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूलचे सहायक शिक्षक इम्तियाज इमामुद्दिन सिद्दिकी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील विज्ञान शिक्षकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या शाळेतील किमान १० विद्यार्थ्यांना वेबिनारमध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सायनी, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आणि रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजन रहाटे यांनी केले आहे.


.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments