रत्नागिरीत अनेकांची फेसबुक अकाऊंट हॅक
रत्नागिरीत अनेकांची फेसबुक अकाऊंट हॅक
रत्नागिरी:रत्नागिरीतील नामवंत वकीलाच्या मोबाईल वरील व्हाट्सअॅप हॅकिंगचे प्रकरण ताजे असतानाच शहरासह खंडाळा येथील मुलीचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीतील ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी केली तसेच अश्लील फोटो देखील अपलोड केले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दोघा युजर्सनी तातडीने आपले फेसबुक अकाऊंट बंद केले. त्यामुळे फसवणूक होण्यापासून दोघी बचावल्या. खंडाळा येथील राजेंद्र भडसावळे यांच्या पत्नी व मुलीचे अकाऊंट अज्ञातांनी हॅक केले.
क्लिक करा आणि वाचा:पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला; मृत्यूचं कारण............
यावेळी हॅकर्सने भडसावळे यांच्या मुलीच्या फेसबुक मेसेंजर वरून मित्रांना मेसेज पाठवून आपल्याला मदतीची गरज आहे. त्यासाठी 10 हजार रूपये गुगल पे करा असा मेसेज पाठवला. असाच प्रकार रत्नागिरी शहरातील चांदोरकर मसाले उद्योग यांच्या बाबतीतही घडला. त्यांच्या नातेवाईकांचे देखील फेसबुक अकाऊंट अज्ञाताकडून हॅक करण्यात आले. तसेच आपण अडचणीत आहे. आपल्याला पैशाची गरज आहे अशी विनवणी या मेसेजमधून करण्यात आली. मात्र हा प्रकार या व्यवसायिकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या मित्र परिवाराला कळवून फेसबुक अकाऊंट बंद केले.


Informative
ReplyDeleteThanks I will log out my fb today