रत्नागिरी-गुरुमळीत आंबा बागेत गळफास घेत गुरख्याची आत्महत्या
रत्नागिरी-गुरुमळीत आंबा बागेत गळफास घेत गुरख्याची आत्महत्या
रत्नागिरी:-शहरानजीकच्या गुरुमळी येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराने कलमाच्या फांदीला टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी पहाटे 5.30 वा.सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा:वजन कमी करायचंय?पाहा काही TIPS
कल्लू राम डांगोरा (45,मुळ रा.नेपाळ सध्या रा.गुरुमळी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.याबाबत प्र्रदीप विष्णू सावंत (60,रा.नाचणे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे खबर दिली.त्यानुसार,डिसेंबर 2020 पासून कल्लू राम डांगोरा हा त्यांच्या बागेत राखणीच्या कामासाठी बागेत झोपडी बांधून रहात होता.मंगळवारी पहाटे त्याचा मोबाईल फोन सतत वाजत असल्याने बागेतील इतर कामगारांनी त्याच्या झोपडीत जाउन पाहिले परंतू डांगोरा आपल्या झोपडीत त्यांना दिसून आला नाही.
क्लिक करा आणि वाचा:शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात अडकलाय; CM उद्धव ठाकरे मवाळ झालेत!'-रामदास आठव
म्हणून त्यांनी आजुबाजुला त्याचा शोध घेतला तेव्हा प्रदीप सावंत यांच्या पुतण्याच्या बागेत कल्लू राम डांगोरा त्यांना कलमाच्या फांदीला टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.याबाबत इतर कामगारांनी प्रदिप सावंत यांना फोन करुन याची माहिती दिली.सावंत यांनी याबाबत शहर पोलिसांना खबर देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागा मिळणार, ठेंगा नाही"-जिल्हाध्यक्ष आणि विजय भोसले यांची माहीती
..........................................

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा