*महिलांना संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार...*

 

*महिलांना संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार...*




जिवाजी बाबुराव राणे स्मृति प्रतिष्ठान आणि विवेकानंद ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त गेले 4 महिने स्किल इंडिया मार्फत युवा परिवर्तनच्या मदतीने स्किल इंडिया अंतर्गत महिलांसाठी फ्री किंवा नाममात्र फी मध्ये ब्युटी पार्लर बेसिक ऍडव्हान्स स्पा थेरपी, मेकअप आणि हेअर स्टाईलिंग असे कोर्सेस राबवत होतो. या प्रशिक्षणाचा शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि स्नेहमेळावा अतिशय उस्ताहात पार पडला. या कार्यक्रमासाठी खेड पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती जीवन आंब्रे साहेब, एक्सल कंपनी आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे प्रकल्प अधिकारी श्री. सुरेश पाटणकर सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा स्मृति राणे यांनी महिलांना संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार कसा उभा राहील यांची माहिती दिली. उपाध्यक्ष श्री. रामदास राणे यांनी सूत्रसंचालन केले.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Comments