कारवाई न केल्यास वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊ-इंदीरा गायकवाड
प्रदूषणविषयक नोटीसीला केराची टोपली.
कारवाई न केल्यास वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊ-इंदीरा गायकवाड
रत्नागिरी : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला पालिकेने केराची टोपली दाखविली आहे.साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमधील कचरा जाळुन होणाऱ्या प्रदूषणावरून पालिका गंभीर नाही. अजूनही कचरा जाळुन प्रदूषण केले जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या फेर पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेवर वरिष्ठ कार्यालयाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी पालिकेने शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी प्राणघातक खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पमध्येच डंपिंग ग्राउंड आहे.ते गलिच्छ बनले आहे.त्यातून कावळे व घारी मेलेल्या कोंबड्यांचे व टाकलेल्या मटणाचे अवशेष उचलून जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याच्या टाकीवर बसून खातात . त्यातले मास पाण्याच्या टाकीत पडते . विशेष म्हणजे शिवसेना शाखा क्रमांक १ च्या समोरच डम्पिंग ग्राउंड आहे.दिवस-रात्र कचरा पेटवून पालिका रत्नागिरीतील नागरिकांच्या नाकातोंडात धूर जात
आहे.आजूबाजूच्या लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत.
काल भर दुपारी हा कचरा पेटवल्यामुळे साळवी स्टॉप परिसरात भर दिवसा वाहनचालकांना धुराच्या लोटाना तोंड द्यावे लागले.दुचाकी चालकांना व रिक्षावाल्यांना घशाचा त्रास होत आहे.शहरातील नागरिकांना रस्त्यावरील मातीची धूळ व कचरा पेटून त्यातून निघणारा धूर नाकातोंडात जात आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मुलभूत विषयांवर सत्ताधाऱ्यांबाबत प्रचंड संताप आहे.जाब विचारणारा कोणी वाली नाही नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर पालिकेला नोटीस बजावली आहे.असे असूनसुद्धा रत्नागिरी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने प्रदूषण मंडळाच्या नोटीसीलाच केराची टोपली दाखवली आहे.राजरोस कचरा पेटवण्याचा कारभार सुरूच आहे.पालिकेला जाब विचारणारा कोणी वाली नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावले आहे .
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment