जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई

 अलोरे बाजारपेठेच्या मागिल रस्त्याच्या पायवाटेला एका झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई



रत्नागिरी प्रतिनिधी:-

चिपळूण तालुक्यातील अलोरे बाजारपेठेच्या मागिल रस्त्याच्या पायवाटेला एका झाडाखाली मटका जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकुन कारवाई केली आहे. हसन कासिम अनवारे (४८), रा.अलोरे मोहल्ला हा गैरकायदा बिगरपरवाना कल्याण मटका जुगाराचे साहित्य जवळ बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्विकारून जुगार चालवीत असताना मिळुन आला. सदरच्या कारवाईत १,२८९ रुपये किंमतीची रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी १४.१५ वाजता घडली. यासंदर्भात अलोरे शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२१ मध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


टिप्पण्या