भुदरगड पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन



                                                           (छाया - तय्यब अली)

कोल्हापूर :  (प्रतिनिधी)ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश डोंगळे व राष्ट्रीय संस्थापक उपाध्यक्ष श्री धर्मेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री डॉ. शैलेश बलकवडे यांना भुदरगड पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे याकरीता निवेदन देण्यात आले. भुदरगड येथे गेले चार महिने भुदरगड तालुका पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी येण्यासाठी तयार नाहीत. तसेच पोलिस स्टेशनला तालुक्याच्या विस्तार या प्रमाणे स्टाप ही कमी आहे. याचे कारण समाजातील काही लोक पोलिसांच्या बाबतीत खोटे निवेदन तयार करून अवैध धंद्यांना पाठीशी घालत आहेत. पोलीस कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर राजकीय दबाव टाकत खोटी तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे करत आहेत, तरी याविषयी भुदरगड पोलिस कर्मचाऱ्यांना या होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा. कारण स्टाफ कमी असून देखील ते करण्यासारख्या मानेमध्ये जीव धोक्यात घालून आपल्यासाठी कर्तव्य बजावत आहेत, तरी समाजातील काही लोक स्वतःच्या स्वार्थापोटी पोलिसांना बदनाम करत आहेत. त्यामुळे कोणताही पोलीस अधिकारी भुदरगड पोलीस स्टेशनला येण्यासाठी इच्छुक नाही,तरी आपण पोलीस कर्मचाऱ्यांना लोकांच्या दबावातून मुक्त करावे. खोटे निवेदन देऊन पोलिस कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे निवेदन ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्यावतीने देण्यात आले.

 यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री अमित बिरंबोळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र अकोळकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सुनील कुराडे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा नीता शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई पांढरे, भुदरगड तालुका संपर्कप्रमुख सौरभ करडे, भुदरगड तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पवार, कोल्हापूर शहराध्यक्ष श्री ओंकार अकोळकर, कोल्हापूर शहर महिला अध्यक्ष सोनाली रजपूत व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.





...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या