नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी आता गाडी ऐवजी घोड्यावरुन कार्यालयात येणार?
नांदेड :- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना विभागात कार्यरत असणारे सहाय्यक लेखा अधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी मा. जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. सतीश पंजाबराव देशमुख (रोहया) विभागामध्ये सहाय्यक लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिले आहे, त्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, कार्यालयात येताना टू व्हीलर मुळे पाठीच्या कण्याला त्रास होत असून, कार्यालयात वेळेत उपस्थित राहण्यासाठी घोडा विकत घेण्याचे ठरवले आहे. व हा घोडा कार्यालयात आल्यानंतर कुठे बांधावा यासाठी त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना कार्यालयाच्या परिसरात घोडा बांधण्यासाठी जागेची मागणी केली आहे. सध्या त्यांचे हे पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून, नक्की त्यांना पाठीचा त्रास होतोय, की पेट्रोल महाग झाल्यामुळे त्यांनी दुचाकी वाहन चालवणे थांबवायचे ठरवले आहे. याचीच चर्चा सध्या सोशल मीडिया वरती होत आहे. आता जिल्हाधिकारी त्यांना कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची जागा उपलब्ध करून देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


Comments
Post a Comment