चिपळुणात घरफोडी, ४ लाखांचा ऐवज लांबविला
चिपळूण : कराड मार्गावरील पिंपळीवरचीवाडी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिराग कृष्णा तारये (वय २८, रा.पिंपळी खुर्द वरचीवाडी) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारये हे १८ ते २१ मार्च या कालावधीत घर बंद करुन बाहेर गेले होते. घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत, चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्या तरी लोखंडी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख २ हजार ९५० रुपये किमतीचे दागिने तर २ हजार रुपये असा ऐवज चोरून नेला. याबाबत अधिक तपास पाेलीस करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा