वेडाच्या भरात तरुणाकडून आजीसह मावशीची हत्या, हातपाय बांधून कुऱ्हाडीने केले वार, हिंगोलीतील घटना

 हिंगोली : वेडाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मावशी व आजीचे हातपाय बांधून कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहिदास चऱ्हाटे असं आरोपीचं नाव आहे. 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील 28 वर्षीय रोहिदास चऱ्हाटे हा मनोरूग्ण स्वभावाचा तरुण 80 वर्षाची आजी देविकाबाई दशरथ पहारे यांच्याकडे गावाजवळील एका शेतातील शेडमध्ये राहत होता. याचठिकाणी त्याची मावशी मंगलबाई उत्तम बशीरे ही पुसेगाव येथे आली होती. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास रोहिदास चऱ्हाटे याने वेडाच्या भरात आजी व मावशीचे हात पाय बांधून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात सुरवात केली.


यात मावशी मंगलबाई उत्तम बशीरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आजी देविकाबाई पहारे जखमी झाल्याने त्यांना हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, सपोनि सुनिल गिरी,  अशोक कांबळे, जमादार पोटे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले आहे. रोहिदास ने कृत्य नेमके कोणत्या कारणासाठी केले हे मात्र समजू शकले नाही. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments