रत्नागिरी-साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रातील भंगार सामान गेले चोरीला
रत्नागिरी :-रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील जुने भंगार सामान चोरीला गेल्याची घटना दिनांक १५ मार्च २०२१ रोजी २१.०० वा. ते दिनांक १६ मार्च २०२१ रोजी ०६.०० वा. चे मुदतीत घडली. या घटनेत विशाल श्रावण चव्हाण(वय-२०), रा.साळवी स्टॉप रत्नागिरी, एक अनोळखी इसम, गाव माहित नाही, वय सुमारे ४० ते ४५, उंची ५ फूट ६ इंच, अंगात पांढ-या रंगाचा फूल हाताचा शर्ट व राखाडी रंगाचा पायजमा या दोन व्यक्तींनी एक काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा तिच्यामागे jamadar असे लिहिलेली रिक्षा नंबर माहित नाही, या रिक्षामधून येऊन जलशुद्धीकरण केंद्राचे जुने भंगार सामान चोरुन नेले. याबाबतची फिर्याद प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती वैदेही विनोद चव्हाण यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दिली आहे. यासंदर्भात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दिनांक १८ मार्च २०२१ रोजी विशाल श्रावण चव्हाण(वय-२०), रा.साळवी स्टॉप रत्नागिरी, एक अनोळखी इसम, गाव माहित नाही, वय सुमारे ४० ते ४५, उंची ५ फूट ६ इंच, अंगात पांढ-या रंगाचा फूल हाताचा शर्ट व राखाडी रंगाचा पायजमा या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा