मंडणगडमध्ये बैल, गाय व म्हैशीच्या मांसाची वाहतूक करणा-या बोलेरो पिकअपवर कारवाई




 मंडणगडमध्ये बैल, गाय व म्हैशीच्या मांसाची वाहतूक करणा-या बोलेरो पिकअपवर कारवाई



विकास राजेंद्र कुमार, निरिक्षक, सीमा शुल्क कार्यालय दापोली व त्यांच्या स्टाफला पेट्रोलिंग दरम्याने बोलेरो पिकअप मांस वाहतूक करित असताना मिळुन आली



रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील मौजे वलौते गावातील गुरांच्या वाड्यात फरशी तिठा येथे विकास राजेंद्र कुमार, निरिक्षक, सीमा शुल्क कार्यालय दापोली व त्यांच्या स्टाफला पेट्रोलींग करित असताना २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे बैल, गाय व म्हैशीचे मांस महिन्द्रा बोलेरो पिकअप चार चाकी गाडी नंबर एम.एच.०१/सी.व्ही/१३६० या वाहनातून वाहतूक करित असताना मिळुन आले. या घटनेने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विनापरवाना गुरांची कत्तल करुन मांस वाहतूक करण्यात होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ही घटना दिनांक २९ मार्च रोजी रात्री १०:३० वा. ते ३० मार्च रोजी ००.३० वा.चे मुदतीत घडली आहे. सदर घटनेची फिर्याद मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अमर विलास मोरे यांनी दिली. या कारवाईत आरोपी इरफान अमीउद्दीन कुरेशी, रा.गोवंडी, टाटानगर, मुंबई, सैफ असलम कुरेशी, रा.कुरेशीनगर, कुर्ला(पुर्व) मुंबई, अब्दुल मुनाफ अब्दुल रऊफ चौगुले, रा. वलौते, ता.मंडणगड, इम्रान पुर्ण नाव माहीती नाही, रा.गोवंडी, टाटानगर, गोवंडी रेल्वे स्टेशनजवळ, झोपडपट्टी मुंबई यांच्यावर मंडणगड पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२१ भा.दं.वि. कलम ४२९, ३४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ५(ब)(क), ९(अ), मोटार वाहन कायदा कलम १८१, १३०/१७७, ११३/१९४, १९२(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी इरफान अमीउद्दीन कुरेशी  व सैफ असलम कुरेशी यांना दिनांक ३० मार्च रोजी १९.१२ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास खेड उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशिद करित आहेत. 



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments