*आंबये विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा*
*आंबये विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा*
----------------------------------
खेड-( मंदार आपटे)- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवसमराठी भाषा दिन व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार.शेखरजी निकम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विद्यालयाचे चेअरमन गजानन सकपाळ यांच्यअध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज जाधव यानी केले, त्यामध्ये मराठी राज भाषा दिन , का साजरा केला जातो यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर
कार्यक्रमाला उपस्थित असणारे आंबये गावचे विद्यमान सरपंच मा.तुकाराम सकपाळ
उपसरपंच श्रीमती मेघना जाधव सदस्या सौ.शालिनी जाधव , माजी सैनिक काशिराम सकपाळ, माजी सरपंच .दगडू जुवळे शिक्षण प्रेमी.नारायण जाधव, सामाजिक कार्यकर्ते .महादेव सकपाळ, माजी विद्यार्थी सचिन सकपाळ मंगेश सकपाळ व ज्यानी संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन घडवून आणले ते पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते
राजाभाऊ चव्हाण यांचे श्रीफळ, पुष्पगुच्छदेऊन प्रथम आंबये विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
त्यानंतर निबंध स्पर्धेतील
विजयी स्पर्धेक
१) कुमारी स्नेहल शेलार
(प्रथम क्रमांक ) ५०१/- रूपये
२) कुमारी साक्षी जुवळे
(द्वितीय क्रमांक ) ३०१/- रूपये
३) कुमारी प्राची जुवळे
(तिसरा क्रमांक) २०१/- रूपये
४) कुमारी प्रिया जाधव
(उत्तेजनार्थ ) १०१/- रूपये
५) कुमारी प्रेरणा जाधव
(उत्तेजनार्थ ) १०१/- रूपये
या विजयी स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थांना कंपास पेटी, जनरल नाँलेज पुस्तक, व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री.विजय नगरकर सर, यांनी केले तर, आभार श्री. भरत गोताड सर यांनी व्यक्त केले. व ज्यानी हा अतिशय देखणा समारंभ घडवून आणला ते मा.राजाभाऊ चव्हाण याना विशेष धन्यवाद देऊन उपस्थित मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121



Comments
Post a Comment