अरे बापरे...आज जिल्ह्यात सापडले 64 कोरोना पॉझिटिव्ह





 अरे बापरे...आज जिल्ह्यात सापडले 64 कोरोना पॉझिटिव्ह


रत्नागिरी : काल दिनांक 24 मार्च रोजी जिल्ह्यात 28 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. मात्र आजचा आकडा चिंताजनक असून आज 64 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,555 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या अहवालात 57 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 7 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज रत्नागिरी शहरातील एका शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने ती शाळा देखील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने आता जबाबदारीने वागत कोरोना संबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या