रत्नागिरी जिल्ह्यात 5 हजार 880 जणांना कोरोना लसीकरण







 जिल्ह्यात 5 हजार 880 जणांना कोरोना लसीकरण



रत्नागिरी:- जिल्ह्यात 59 केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोना योध्यांनंतर प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 मार्च पासून आतापर्यंत 5 हजार 880 जणांनी लस घेतली.जिल्ह्यात 16 जानेवारीपासून फ्रंटलाईन कोरोना योध्द्यांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात 15 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची यादी शासनाला सादर केली. या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही लस घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून करण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक-सेविकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या 15,773 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी 9 हजार 422 जणांनी लस घेतली. तसेच महसूल, पोलीसांपैकी 23 टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले होते. महसूल कर्मचार्‍यांपैकी लसीकरणासाठी 1 हजार 20 जणांची तर पोलीसांपैकी 1 हजार 717 जणांची यादी होती. पुढील टप्प्यात प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांसह कोमोर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. 1 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणात समावेश केला आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 17 जणांना या लसीकरणाचा लाभ देण्यात आला. 60 वर्षे वरील ज्येष्ठांमध्ये एकूण 4 हजार 863 लोकांनी कोविड व्हॅक्सीनचा डोस घेतला.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments