नीट पाहा! या फोटोतधावणारा नेमका माणूस की प्राणी ? इंटरनेटवर झाला फोटो VIRAL
नीट पाहा! या फोटोतधावणारा नेमका माणूस की प्राणी ? इंटरनेटवर झाला फोटो VIRAL
विदेशी पत्रकार निकोलस थॉम्पसनने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला असून या फोटोने अनेकांना बुचकाळ्यात पाडलं आहे.
नवी दिल्ली: इंटरनेटवर सध्या बर्फाच्छादित प्रदेशातील एक फोटो खूपच व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो एका विदेशी पत्रकाराने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला असून या फोटोने अनेकांना गोंधळात टाकले आहे. खरंतर या फोटोकडे पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी आपल्याला बर्फाच्छादित प्रदेशात एक व्यक्ती धावताना दिसेल. ज्याने थंडीपसून वाचण्यासाठी काळ्या रंगाचे गरम कपडे घातल्याचा भास होईल, पण नंतर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल.
हा फोटो एक विदेशी पत्रकार निकोलस थॉम्पसनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेक नेटकरी बुचकाळ्यात पडले आहेत. एक व्यक्ती हिमवर्षावात बर्फावर धावत असताना दिसणारा हो फोटो नेमका कशाचा आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक व्यक्ती हिमवर्षाव होत असताना बर्फाच्या पर्वतावर चढत असल्याचा भास सर्वप्रथम आपल्याला होतो.
पण हा फोटो जर आपण लक्षपूर्वक पाहिला, तर कोणता तरी वेगळाच प्राणी असल्याचं दिसेल. फोटोमध्ये दिसणारा जीव मनुष्य नसून एक बर्फाळ प्राणी आहे. बर्फाच्छादित प्रदेशातील हा प्राणी अस्वल किंवा कुत्रा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निकोलस थॉम्पसन यांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आज रात्रीसाठी तुमच्यासाठी एक ऑप्टिकल भ्रम. सुरुवातीला बर्फात एखादा माणूस धावताना दिसेल…आणि त्यानंतर...'
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या फोटोला 2 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर तीस हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला रिट्वीट केलं आहे.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
.......................................

Comments
Post a Comment