अगं ए श्वेताsss, सोशल मीडियावर नुसत्या आवाजामुळंच तुफान व्हायरल होणारी ही श्वेता.. आहे तरी कोण ?

 मुंबई : सोशल मीडियाच्या या वर्तुळात प्रत्येक क्षणाला ट्रेंडमध्ये येणारे असे अनेक विषय आहेत. हे विषय ट्रेंडमध्ये येण्यामागची कारणंही तशीच आहेत. आता हे ट्रेंडिंगचं गणित नेमकं कसं आहे, ही बाब किंबहुना हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करत असतो. हा एक वेगळाच मुद्दा. पण, सध्या या ट्रेंडिंग जगतामध्ये एकाच नावाची चर्चा सुरु आहे. हे नाव म्हणजे श्वेता.

ही श्वेता (Shweta) कोण, कुठची, काय करते, ती एकाएकी चर्चेत नेमकी का आली आहेहाच प्रश्न सध्या सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. या मुलीच्या नावे असंख्य मीम्स तयार करण्यात आले असूनश्वेताट्रेंडमध्ये आली आहे.
याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
   एका ऑनलाईन क्लासमध्ये श्वेता नावाच्या मुलीनं कहरच केला. ऑनलाईन क्लासदरम्यान ती कोणाशीतरी संवाद साधत होती. यावेळ श्वेता तिच्या ऑनलाईन क्लासदरम्यान माईक बंद करण्यास विसरली. कोणा एका व्यक्तीबद्दल, खासगी नात्यांबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल बऱ्याच पुढच्या चर्चा ही श्वेता करत असल्याचं या व्हायरल ऑडिओ क्लीपमधून ऐकण्यास मिळत आहे. बरं, श्वेता बोलण्यात इतकी मग्न होती, की ऑनलाईन क्लासमध्ये असणाऱ्या इतर विद्यार्थांनी तिला, माईक बंद करण्यास सांगूनही तिच्या कानांवर हे शब्द पडले नाहीत. इथूनच हीश्वेतावाणी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments