BREAKING NEWS:टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’ कडून ‘एमएमआरडी’ च्या आयुक्तांना समन्स!

 

टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’ कडून ‘एमएमआरडीए’ च्या आयुक्तांना समन्स!

आता आर.ए. राजीव यांना ‘ईडी’समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 



मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने  आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘ईडी’कडून मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सचिव आर.ए. राजीव यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता आर.ए. राजीव यांना ‘ईडी’समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता.
या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता.
यापूर्वी डिसेंबर महिन्यात ‘ईडी’कडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, प्रताप सरनाईक यांच्या डिसेंबर महिन्यातील चौकशीनंतर हे प्रकरण फारसे पुढे सरकले नव्हते. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी ईडीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपली चौकशी केल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता ईडीने थेट ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांनाच समन्स पाठवल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

 


  • काय आहे नेमका घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती




...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256






Comments