रत्नागिरितील सैतवडे बोरसई मोहल्ला येथे चोरी, जयगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद





रत्नागिरितील सैतवडे बोरसई मोहल्ला येथे चोरी, जयगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद


रत्नागिरी प्रतिनिधी:-रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे बोरसई मोहल्ला येथे रविवारी चोरी झाली. या घटनेतील फिर्यादी रिझवान अब्दुल रहमान अन्सारी याच्या घरात राहणारा व कंस्ट्रक्शनच्या कामाला असलेला नोकर महंमद वैश मनसूर अहमद याने फिर्यादी याच्या घरामध्ये ठेवलेली ७८ हजार रुपये रोख रक्कम, ३९ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हँडसेट, व घराच्या बाहेर लावून ठेवलेली १ लाख रुपये किंमतीची टी.व्ही.एस. इन्टॅक्स मोटारसायकल नंबर एम.एच.०८/एव्ही/२५८९ असा एकूण २ लाख १७ हजार रुपये किंमतीचा माल व रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमत्तीशीवाय लबाडीने चोरुन नेला असल्याची घटना घडली. याबाबत जयगड पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२१, भा.दं.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments