पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात मोदी सरकारचा निषेध



कोल्हापूर :- स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल, डिझेल हे इंधन मानवी जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. या वस्तू असल्याशिवाय आजमितीला मनुष्य जीवनच जगू शकत नाही. असे असताना आज आपल्या देशामध्ये पेट्रोल प्रतिलिटर 99 च्या पुढे,  डिझेल 90 रुपयांच्या पुढे तर स्वयंपाकाचा गॅस आठशे रुपयाच्या आसपास झाला आहे. आणि दिवसेंदिवस तो वाढतच आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाला मानवी जीवन जगणे अशक्य झाले आहे. गेली वर्षभर लॉकडाऊनमुळे लोकांचे उद्योग,  रोजगार चालू बंद असल्यामुळे जनता आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे जनतेला ही दरवाढ जगणे साहाय्य करणारी आहे. जनतेमध्ये या दरवाढीमुळे असंतोष असताना, आज त्या देशाची राज्यकारभाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हातात असताना ते याबाबत कोणतीच प्रतिक्रिया कि दरवाढ कमी करण्यासंबंधी काही प्रयत्न करताना दिसत नाही. ही अतिशय निंदनीय बाब असून या दरवाढी विरोधात कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, मनोज जगताप, संभाजीराव जगदाळे, श्रीकांत भोसले, भाऊ घोडके, लहू शिंदे, सुनील मोरे, किशोर घाटगे, सुनील पाटील, विलास बोगाळे, रमाकांत आंग्रे, दीपक मोहिते, सुनील मोरे, महादेव जाधव, रामभाऊ कोळेकर, संदीप पोवार, रामचंद्र जगताप आदी उपस्थित होते.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments