आता ड्रायविंग लायसन साठी नाही द्यावी लागणार टेस्ट, काय आहे सरकारचा नवा नियम?जाणून घ्या!
मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. यामध्ये आता नागरिकांसाठी आणखी सोयीच्या योजना आखण्यात येत आहेत. सरकार आता यामध्ये आणखी एक मोठा बदल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देणं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.

Comments
Post a Comment