कोंडिग्रे येथे विजयी उमेदवारांचा सत्‍कार.



 









कोंडिग्रे येथे विजयी उमेदवारांचा सत्‍कार.

कोंडिग्रे: येथील जेट्टयाप्पा बिरदेव मंदिर या ठिकाणी नुकत्याच झालेल्या शिरोळ तालुक्यातील 33 गावच्या ग्रामपंचायत  निवडणुकीमध्ये कोंडिग्रे येथे विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने जेट्टयाप्पा बिरदेव महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा, तसेच ग्रामपंचायत नूतन सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच काही अपक्ष उमेदवारांचा सत्कार कोंडिग्रे येथील दैनिक फ्रेश न्यूज चे पत्रकार बाळासो शिंदे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अपक्ष उमेदवार जिवाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडत असताना म्हणाले, की ज्या विश्वासाने कोंडीग्रेच्या जनतेने या आघाडीला बहुमताने निवडून दिले. 



त्याच विश्वासाने या उमेदवारांनी गट न मानता गावच्या विकासाच्या दृष्टीने बहुमोल कार्य करणे गरजेचे आहे. गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन संपूर्ण कोंडीग्रे गावचा विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. याप्रसंगी पॅनल प्रमुख सुनील कामत म्हणाले, की कोंडिग्रे गाव जरी लहान असले, तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी आघाडीने प्रयत्न केला पाहिजे. तसेच गावातील निराधार महिला यांना संजय गांधी योजनेचा लाभ आपण त्यांना मिळवून दिला पाहिजे आणि गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणे आज गरजेचे आहे. यावेळी त्यांनी दैनि फ्रेश न्यूजचे प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटके नियोजन केल्यामुळे त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी कोंडिग्रे गावचे नुतन ग्रामपंचायत सदस्य बाळासो हांडे, दादासो मगदूम, मनीषा कोळेकर, सुशांत भुजगडे, अक्काताई खिल्लारे, किरण भोसले, उज्वला पाटील, संगीता काडगे तसेच अपक्ष उमेदवार जीवाजी कांबळे, रंगुबाई कांबळे या सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि पॅनल प्रमुख कल्लाप्पा हांडे, काशिनाथ गायकवाड, सुनील कामत ,बबन भुजगडे, प्रकाश कोळेकर, आण्‍णासो बिलोरे, दिलीप यादव, बाबूराव डोंगरे, बाबुराव मालगावे, युवा नेते अक्षय कामत, सुजित कामत, संदीप कांबळे, विनायक कांबळे, संजय सुतार ,रोहित मालगावे, मधुकर चव्हाण, शिवाजी कांबळे, तानाजी कांबळे, चिमाजी  हणबर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार सुनील कामत यांनी मानले.


...............................

२ लाख हून अधिक वाचक

५००+ व्हॉट्सॲप ग्रुप

ऑनलाईन व प्रिंट मीडिया

.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.


Comments