'वेब सीरिज'च्या नावावर तरुणींची पॉर्नफिल्म बनवणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या बेड्या

मुंबई:अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायला अनेक कलाकार मुंबईची वाट धरतात. मात्र, प्रत्येकालाच या क्षेत्रात यशस्वी होता येतं असं नाही. या कलाकारांचा अनेकदा फायदा उठवला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.
वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम देतो असे सांगून अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.
मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. पॉर्न साईट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून हे सर्व बॉलिवूडशी संबंधित आहेत. अभिनयाची आवड असलेले अनेक तरुण आणि तरुणी मुंबईत येत असतात. अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. याचा परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी घेत असून उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळूंखे, सुनील माने, अमित भोसले, योगेश खानुरे, अर्चना पाटील, सोनाली भारते यांच्या पथकाने मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. यावेळी पलंगावर एका अश्लिल चित्रफितीचे शूटिंग सुरु होते. पोलिसांनी हे करणाऱ्या पाच जणांना बंगल्यातून अटक केली. यामध्ये दोन अभिनेता, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांचा समावेश आहे.

...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क साधा :9529501121/9529880144
कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.

Comments
Post a Comment