लाल -दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
लाल परी
गाव - शहरे जोडीत
अविरत ही धावते
जिव्हाळ्याची लाल परी
नव भविष्य दाविते ॥१ ॥
ऊन वारा नि पाऊस
सार्या ऋतूंना झेलते
दाटीवाटीने भरून
सारा भार ती पेलते ॥ २ ॥
दऱ्या खोऱ्यांच्या सडका
तिला नाही अडवित
लाल मातीचा गुलाल
येते नभी उडवीत ॥ ३ ॥
अंध, अपंग, जेष्ठांचा
मान - सन्मान ठेवते
माया ममतेने त्यांना
काही आसने राखते ॥ ४ ॥
अशी लाल परी आहे
प्रवाशांची खरी शान
सेवा - चाकरी करिते
आम्हा तिचा अभिमान ॥ ५ ॥
राजू सुर्वे, गुहागर
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment