खऱ्या आयुष्यात डाएट फूडपासून राहते दूर ! तरीही अंजली भाभी इतकी फिट कशी?
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये लॉकडाउननंतर नवीन अंजली भाभी म्हणजेच सुनैना फौजदार या शोमध्ये दिसू लागली आहे. या शोमध्ये येऊन तिला फार वेळ झाला नाही. मात्र, तरीही तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. सुनैना फौजदार ही भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारत असून नेहा मेहताप्रमाणे तारकच्या तब्येतची काळजी घेत आहे.
वास्तविक जीवनात, सुनैना फौजदारचा डाएट फूडशी काही संबंध नाही. उलट ती डायटिंगपासून दूरच आहे. तिच्या फिटनेसचे रहस्य डाएट फूड नाहीतर दुसरेच आहे. सुनैना फौजदारची परफेक्ट फिगर पाहिल्यानंतर कोणीही म्हणेल की ती काटेकोरपणे डाएट फोलो पाळत असेल किंवा जास्त खाण्या-पिण्याची काळजी घेत असेल. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की असे काहीही नाही. सुनैना खाण्यापिण्याच्या बाबतीत अजिबात हयगय करत नाही. अशा परिस्थितीत सनैना इतकी फिट कशी? तर याचं उत्तर आहे डान्स. सुनैनाला नाचायला फार आवडते. यामुळेच ती स्वतःला एकद फिट ठेवते.
सुनैनाचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्याचदा व्हायरल होतात. ती तिच्या डान्सचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर शेअर करते. नृत्याव्यतिरिक्त ती हलक्या स्वरुपाचा व्यायाम देखील करते. पण, नृत्य हा तिचा फिटनेस मंत्र आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटही याची साक्ष देते.


Comments
Post a Comment