लाॅकडाऊन ची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडू नका :- जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी
मिरज:- ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पुन्हा लाॅकडाऊन होणार यांची भिती घालून द्राक्ष, भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.परंतु कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही.त्यामुळे द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लाॅकडाऊनची खोटी भिती घालून व्यापारांनी शेतीमालाचे दर पाडू नयेत.अन्यथा लाॅकडाऊन संदर्भात अफवा पसरविण्यावर कारवाई करण्यात येईल.असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळात नाही.कोरोनामुळे पुन्हा लाॅकडाऊन ची भिती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती.या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी हा इशारा दिला आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा