माझा मी -दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास



 माझा मी 

हसऱ्या या चेहर्‍या आड
दुःखाची झालर दडलीय
आयुष्याचं चुकलंय गणित
आजन्माची अद्दल घडलीय  ॥१॥

अंतरंग उडून गेलंय
जीवन फिकंच पडलंय 
जगण्या पुरतं जेवून घेतो
स्वप्नच अवघं सडलंय  ॥२॥

जीवनाचं सार सारं
पार सपक झालंय
वेळ निघून गेल्यावर
आता कळून आलंय  ॥ ३ ॥

हे ही दिवस निघून जातील
प्रारब्ध ही राखेल इमान 
घ्यावं लागतं खोटं हसून
सांत्वन करतो माझंच गुमान॥४॥

घट्ट मिठीत माझंच मला
घ्यायचं बाकी राहिलंय
जीतेपणी मरण माझं
उघड्या डोळा पाहिलंय  ॥५॥

राजू सुर्वे, शृंगारतळी
   फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments