अँम्ब्युलन्स व्यवसायिकांना प्रशासनाचा ठेंगा ?
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अँम्ब्युलन्स व्यवसायिकांना प्रशासनाचा ठेंगा ?
रत्नागिरी : कोरोना काळात रुगांची नेआण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिका संघटनेमार्फत ६ रुग्णवाहिका ताब्यात घेतल्या होत्या. या रुग्णवाहिका अत्यल्प दरात रुग्णवाहिका संघटनेमार्फत पुरवण्यात आल्या होत्या. सदर वाहनाच्या भाड्यापोटी प्रतिमहिना १००० किमी साठी ३० हजार रुपये व त्यानंतर प्रती किलोमीटर साठी ३० रुपये इतके देण्याचे प्रशासनाने काबुल केले होते. या काळात रुग्णवाहिकेचे इंधन, ड्रायव्हर, देखभाल खर्च रुग्णवाहिका मालकांनी केला होता. पण आजवर या तीन महिन्यांचे बिल प्रशासनाकडून अद्याप मिळाले नसल्याने रत्नागिरीतील अँम्ब्युलन्स व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत वारंवार विचारणा करूनही प्रशासन दाद देत नसल्याची माहिती अँम्ब्युलन्स व्यवसायिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. इतर ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या प्रशासनाला कष्टकरी जनतेचे पैसे देता येत नाहीत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
https://t.me/joinchat/LtZfLBeZGB6EHEr6Ks44rw
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment