जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चालवला जेसीबी


भूदरगड :  कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीनी स्वतः जेसीबी चालवला.  पण हा जेसीबी  कोणत्या अतिक्रमणावर चालवला नाही, तर एका चांगल्या कामाचा शुभारंभ साठी  हा जेसीबी  चालविण्यात आला. भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी स्वतः जेसीबी चालवत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. रस्ता बनवणे बाबत परिसरात कोणालाही अडचण नसल्यामुळे जिल्हाधिकारी देसाई साहेब यांनी स्वतः जेसीबी चालवत सदर रस्त्याची सुरुवात केली.     जिल्हाधिकार्‍यांनी जेसीबी चालवला याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील तसेच गावचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. 

Comments