खेड, चिपळूण व दापोली या तीन तालुक्यात मोबाईल तपासणी यंत्रणा
खेड, चिपळूण व दापोली या तीन तालुक्यात मोबाईल तपासणी यंत्रणा
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे निर्देश
रत्नागिरी प्रतिनिधी:-
कोरोनाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनाने कोरोनाविषयक तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हीसी द्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांत अधिकारी विकास सुर्यवंशी आदि संबधित अधिकारी तर व्हीसीद्वारे तालुकास्तरावरील संबधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी खेड, चिपळूण व दापोली या तालुक्यात तातडीने मोबाईल टेस्टींग व्हॅन युनिट सुरु करा. ग्राम कृती दल व नागरी कृती दल यांनी या आधी चांगली काम केलं असून त्यांना पुन्हा कार्यान्वित करा, त्यांच्या बैठका घ्या. जिल्हयात बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवा. ज्या हॉस्पीटलमध्ये ओपीडी जास्त आहे अशा ठिकाणी आणखी टेस्टींग वाढवा अशा सूचना दिल्या आहेत.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment