सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप! शेअर बाजारात भरपाई
शेअर बाजारात भरपाई ; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप!
मुंबई कालच्या जोरदार घसरणीतून सावरत आज सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा तेजीची वाट धरली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० अंकानी वधारला आणि सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५० हजार अंकांची पातळी ओलांडली.
शेअर बाजारात भरपाई ; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप!
शेअर बाजारात भरपाई ; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप!
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२ अंकांनी वधारून ४९७७७ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी ४३ अंकांच्या वाढीसह १४७२६ अंकावर आहे. बाजारात ब्लुचिप शेअरला मागणी आहे. ज्यात बँका, एन बी एफ सी, ऑटो या शेअर मध्ये तेजी दिसून आली आहे. ए यू स्मॉल फायनान्स बँक, इंडियन बँक, पी एन बी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर तेजीत आहेत. तसेच टाटा मोटर्स, सेल, हिंडालको, अशोक लेलँड या शेअर मध्ये वाढ झाली आहे.
पुन्हा लॉकडाउनचे संकट ; दोन दिवसात सोनं ७५० रुपयांनी महागले , जाणून घ्या आजचा दर
काल सपाटून मार खालेल्ला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज यू-टर्न घेतला. आज रिलायन्स ३१ रुपयांनी वधारला असून तो २०३९ रुपये झाला आहे. तसेच टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, आयटीसी हे शेअर वधारले आहेत. सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी वधारला होता. रुपयाचे मूल्य ७२.३३ झाले होते.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment