घे भरारी-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
घे भरारी
उंबरठ्यावर आडू नकोस,
घे गगन भरारी.
तुला बोटावर नाचवणारे ,
इथे किती मदारी .
स्वप्नातच रमू नको,
त्यातून बाहेर पड.
स्वप्न सत्यात आणण्यासाठी,
थोडी धडपड कर.
संसार कर नेटाने पण,
गुंतू नकोस त्यात .
फक्त संसार सांभाळण्यातच,
घालवू नको हयात .
त्यांची त्यांना दे ओळख,
मुलाबाळांना घडव.
तुझे स्वत्व अन् स्वाभिमान,
कोंदणात जडव.
पिलांना फुटतील पंख,
घेतील गरुड भरारी.
आकाशाला गवसणी घालण्याची,
कर तुही तयारी.
तु देवकी , तु यशोदा,
तुझ्या गर्भात कृष्णमुरारी.
उत्तुंग अनंताच्या प्रवासासाठी,
घे भरारी... घे भरारी...घे भरारी .
-रेखा कुलकर्णी (©®)
(चिंचवड पुणे)
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment