साप-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास

 




साप

बाप रे बाप रे, केवढा हा साप
पाहता समोर ,उडे थरकाप

आकार तुमचे,लहान नी मोठे
लपून बसता,तुम्ही कोठे कोठे

शेतकरी दादा,म्हणे तुम्हा मित्र
आम्ही फार भितो,दिसताच चित्र

नागमोडी चाल,आहे बघा छान
खरं सांगा तुम्हा,नसतो का कान

राग येता तुम्ही,काढता हो फणा
ताठ उभे होण्या,असतो का कणा

माणसांना म्हणे,फार फार भिता
संकट दिसता,चावा कसा घेता

विषाने मरती,माणसे व प्राणी
कुठे हो ठेवता,विषाची ती गोणी

फुरसे घोणस, धामण मण्यार
नाग अजगर ,नावे फार फार

दगडी फटीत ,हळूच शिरता
अंग जरी मोठे,आत हो चोरता

मुंगसाचे म्हणे, आहे हाड वैर
सापडता त्याला ,नाही काही खैर

श्री.युवराज गोवर्धन जगताप
     बार्शी,सोलापूर
   फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या