शिवराय-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास



 शिवराय 

स्वराज्याचा प्राण तू
महाराष्ट्राची शान होतास तू,
शिवनेरीचा तेजस्वी सूर्य तू
सिंहगडाचा पर्व होतास तू.

मातृभूमी चा आभाळ तू
मुघलांचा कर्दनकाळ होतास तू,
शहाजीचा  पोर तू, असा  
महापुरुष थोर  होतास तू .

रणांगणातील शूर तू 
सई चा  नूर होतास तू,
युद्धातील गनिमी कावा 
असा सिंहाचा छावा होतास तू.

सह्याद्रीच तुफान वार, 
जशी  तडपती तलवार होतास तू,
तुळजा आईचा सेवक, खरा 
स्त्रीजातीचा रक्षक  होतास तू.

जो लिहिला गेला रक्ताने
त्या इतिहासाचा पान होतास तू,
जो झुकला नाही कुणापुढे, 
त्या भगव्याचा खरा मान होतास तू.

शत्रूचा काळही  तू  अन
मैत्रीचा बांध होतास तू,
रयतेचा जाणता राजा, 
असा 'शिवराय' माझा होतास तू.

भूपेश चिंतामण    
कोरेवार 
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments