हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदार यांना इंधनवाढविरोधात निवेदन

पेठवडगाव (श्री. सुशांत दबडे)- देशात पेट्रोल, डिझेल, गॅस किंमती सर्वोच्च पातळीवर पोहचल्या असून त्यात दररोज वाढ होत आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेवर मोदी सरकारने इंधन दरवाढीचा आघात केला आहे. या दरवाढीविरोधात हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

       आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या जनतेची अशाप्रकारे लूट कदापी सहन करणार नाही. सरकारने इंधन दरात तात्काळ कपात करावी अन्यथा जनतेच्या तीव्र संतापला सामोरे जावे असा इशारा देण्यात आला. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव, सुरेश नाईक, आणासो पाटील, भैरवनाथ पवार, विजय गोरड, किरण माळी, सदानंद महापुरे, शंकर शिंदे, बबनराव पाटील, बाजीराव सातपुते, महमंद महात, उमेश गुरव, संजय पुजारी, जावेद पाथरवट, निवृत्ती शिंदे, कृष्णा वाठारकर आदी उपस्थित होते.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments