सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य, मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांची जयंती साजरी


मिरज:- (आशितोष माने )श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे  औचित्य  साधून सेवक संघटीत व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य तर्फे मिरज येथील शास्त्री चौक, श्री रेणुका मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात रक्तदान झाले नाही म्हणून रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा  भरून काढणे फार गरजेचे आहे.  कारण रुग्णाच्या उपचारावेळी रक्ताची गरज असते. त्यावेळी जर रक्त नाही मिळाले, तर रुग्णाचे जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच "रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते". कारण कोणाचे जीव वाचवणे म्हणजे त्या रुग्णाच्या परिवाराला वाचवणे आहे. म्हणून सद्यास्थितीत रक्ताची फार गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ ताटे साहेब यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण घालण्यात आला. सेवक आरोग्य संघटना ही सर्व कर्मचारी यांना एकत्र करून, त्यांच्या समस्या समजून त्या समेस्येवर योग्य तो मार्ग काढावा व  त्या कामी महापालिकेच्या वतीने जे सहकार्य लागेल ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत असे आश्वासन यावेळी ताटे साहेब यांनी दिले. शेवटी संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करून  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ महावीर (तात्या) कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमरफारुक (भाई) कमरी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ.ममता कांबळे, सचिव फिरोज मोमिन, खजिनदार तोफिक मिरजकर, सदस्य अ. गफ्फार, मुश्रीफ जिल्हा संघटक प्रशांत कदम,  प्रसिद्धी प्रमुख मनोहर कांबळे, सागर आठवले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 

...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments