इंधन दरवाढ तापदायक!

 


इंधन दरवाढ तापदायक!



            इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशात काँग्रेस कार्यकत्र्यांनी अर्ध्या दिवसाचा बंद पाळला.इंधन दरवाढीचा प्रश्न जटिल व मनस्तापाचा असून इंधनाच्या किमती कमी करण्याशिवाय त्यासाठी कुठलेच समाधानकारक उत्तर असू शकत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकार यांनी चर्चा करून इंधनाची किरकोळ किंमत कमी करण्यासाठी तोडगा काढावा, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी म्हटले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवताना आयात इंधनावर देशाचे अवलंबित्व वाढवल्याने ही वेळ आल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते.इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशात काँग्रेस कार्यकत्र्यांनी अर्ध्या दिवसाचा बंद पाळला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले, की पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. सरकार महसूल गोळा करण्यात मश्गूल आहे. त्यांना लोकांच्या भावनांची काहीच काळजी नाही. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सांगितले, की इंधन दरवाढीतील पैसा कोठे जातो आहे? हा पैसा पश्चिम बंगालमध्ये तर जात नाही ना? मी म्हणतो ते चुकीचे असेल तर चांगलेच आहे.
           इंधर दरवाढीमुळे सध्या ‘धर्म संकटा’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र इंधन दरांवर नियंत्रण ठेवणे सरकारच्या हाती नाही. दर इंधन विक्रेत्या कंपन्या ठरवीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन ग्राहकांना योग्य दरात पेट्रोल आणि डिझेल कसे देता येईल, यााबाबत चर्चा करावी.  – निर्मला सीतारामन


नवे दर…


  • गेल्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर झाले.


  • शनिवारी पेट्रोलचे दर लिटरला ३९ पैसे वाढले असून दिल्लीत ते लिटरला नव्वद रुपयांपर्यंत गेले आहेत.


  • ’डिझेलचे दर लिटरला ३७ पैसे वाढीने ते आता ८० रुपये ९७ पैसे झाले आहेत.


  • ’मुंबईत पेट्रोलचे दर लिटरला ९७ रुपये असून डिझेलचे दर लिटरला ८८ रुपये ६ पैसे आहेत.


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments