राज्यात करोना लसीकरणाचे 'साइड इफेक्ट' किती? 'व काय आहेत जाणून घ्या !
राज्यात करोना लसीकरणाचे 'साइड इफेक्ट' किती? 'ही' पाहा आकडेवारी
राज्यात करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या सात लाख १३ हजार ६७२ लाभार्थ्यांपैकी केवळ ०.६ टक्के लाभार्थ्यांनाच सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे लसीकरणामुळे 'साइड इफेक्ट'ची आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटणारी भीती फोल ठरली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्ग वाढत असल्याने लसीकरण करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
देशात १६ जानेवारीला लसीकरणाचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली. राज्यात सोमवारपासून लसीकरणाचा दुसरा डोस सुरू करण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या पहिल्या दिवशी कमी होती. राज्यात 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेऊन अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा पहिला डोस घेतला नाही. त्यामुळे राज्याच्या तुलनेत पुण्यात लसीकरणाचे प्रमाण कमी दिसत आहे. पुणे शहरात केवळ ४८ टक्के लसीकरण झाले आहे, तर राज्यातील लसीकरणही निम्मे झाले आहे. अनेक रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक, पॅथॉलॉजी लॅबमधील आरोग्य कर्मचारी, नर्स, वॉर्ड बॉय लशीच्या 'साइड इफेक्ट'च्या भीतीने लसीकरणापासून दूर राहिल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
साइड इफेक्टस
- इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे
- सौम्य स्वरूपाचा ताप
- अंगदुखी, डोकेदुखी
- जुलाब, उलटी
- खोकला, सर्दी
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा