गुलाबपुष्प-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
गुलाबपुष्प
आवडते मला खूप
सुवासिक फुलबाग
असते जरूर तिथे
गुलाब पुष्पांची रांग
मौसमी ऋतूत दिसे
प्रत्येक फुलाची कळी
त्यात अवश्य असते
गुलाब पुष्पाची जाळी
लाल, पिवळा, सफेद
आहे त्याची रंगछटा
हात लावताच क्षणी
रुततो बोटात काटा
फुलांचा राजा म्हणून
देतो त्यांसी उच्च स्थान
त्यावरी असतो सदा
देवाचा पहिला मान
प्रेम सिद्धीसाठी आधी
उभा ठाकतो गुलाब
उत्सव कार्य प्रसंगी
दावितो त्याचा रुबाब
अत्तरे उटण्यात ही
राही गुलाबाचा गंध
धूप अगरबत्ती सुद्धा
देते गुलाबी सुगंध
गुलाबाचा परिमल
असाच दरवळावा
कधीकाळी प्रियेसाठी
मीही गुलाब व्हावा
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा