आरपीआयच्या वतीने नोंदणी ओळखपत्र आणि पावती वाटप अभियानाअंतर्गत स्मार्टकार्ड वाटप
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (लाल बावटा) योजनेअंतर्गत नूतन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नोंदणी ओळख पत्र आणि पावती वाटप अभियान द्वारे (स्मार्ट कार्ड) देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करवीर तालुका अध्यक्ष मा श्री बाळासाहेब वाशीकर हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत वाशी ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा विजय कांबळे, समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री गोपाळ कांबळे, रासप तालुका अध्यक्ष काशिनाथ धनगर, करवीर तालुका संघटक अतुल सडोलीकर हे होते, कार्यक्रमाचे स्वागत श्री मच्छिंद्र कांबळे यांनी केले तसेच यावेळी अधिकारी श्री इंद्रजीत पाटील आणि श्री राहुलराजे निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments
Post a Comment