मिळालेल्या माहितीनुसार, 'धूम ४' च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी दीपिकाला संपर्क केला आहे. त्यावर, दीपिका या भूमिकेबद्दल खूप उत्साही असून चित्रपट साइन करण्यापूर्वी तिच्या उपलब्ध असलेल्या तारखांचा विचार करावा लागणार असल्याचं कळतंय. 'धूम' सीरिजचे सर्व चित्रपट त्यांच्या कथा आणि चित्रीकरणाच्या ठिकाणांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत.अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या सीरिजच्या प्रत्येक चित्रपटात दिसले. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात हृतिक रोशन तर तिसऱ्या भागात आमिर खानने खलनायकाच्या भूमिका साकारल्या. त्यामुळे पुढील भागात एका स्त्री खलनायकाला बघणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं तर, ती दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या 'पठाण' चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे. त्यासोबतच, शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात अनन्या पांडे व सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. शिवाय, ती कबीर खान दिग्दर्शित '८३' मध्ये पती रणवीर सिंह सोबतही झळकणार आहे.

Comments
Post a Comment