रत्नागिरी पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर होलिकोत्सवासाठी सुरु करण्याची मागणी
रत्नागिरी पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर होलिकोत्सवासाठी सुरु करण्याची मागणी
➤रत्नागिरी : दादर रत्नागिरी पॅसेंजर (अप डाऊन) आणि दिवा - सावंतवाडी पॅसेंजर (अप डाऊन) या दोनही पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू कराव्यात,अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख ,पत्रकार संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
➤दरवर्षी होलिकोत्सव तसेच मे महिन्याच्या सुट्टीत कोकण रेल्वेने मुंबई - ठाणे येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.यंदा मात्र कोरोना महामारीच्या कारणास्तव कोकण रेल्वेला खीळ बसली.गेल्या काही दिवसांपासून काही गाड्या सुरू झाल्या असल्या तरी कोकणवासीय प्रवाशांना काही थांबे मिळालेले नाहीत.
➤त्यामुळे अपरिहार्यपणे रस्ते मार्गावरून प्रवास सुरू आहे.हा प्रवास प्रचंड त्रासदायक, खर्चिक आणि खासगी गाड्यांच्या मनमानी पैसे उकळण्याच्या वृत्तीमुळे असह्य झालेला आहे . पर्यटक आणि स्थानिक रहिवासी सातत्याने कोकणात जात-येत असतात.
➤कोकण रेल्वेला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो.याचा विचार शासनाकडून कधीच होत नाही . त्यामुळे रत्नागिरी पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी पॅसेंजर या दोनही गाड्या पूर्ण आरक्षण क्षमतेने तत्काळ सुरू कराव्यात, अशीही मागणी केली जात आहे
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment